जि.प. शाळा थोरगव्हाण येथे वाचन प्रेरणा दिन उत्सवात साजरा

Social कट्टा कट्टा यावल रिड जळगाव टीम साकळी

रिड जळगाव यावल टीम ::> 15 ऑक्टोबर 2020 हा दिवस आपल्या भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या 89 वी जन्म दिनानिमित्त “वाचन प्रेरणा दिन” जि. प. मराठी शाळा थोरगव्हाण येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेमध्ये शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र हिरामण देवरे व शिक्षक वृंद यांनी गावात विद्यार्थींच्या घरी जाऊन गोष्टीचे पुस्तके वाटप केली.

निलेश पाटील यांनी स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप केली व त्यांच्या कडून घरीच त्यांचे वाचन करून घेतले. तसेच गावात फिरून ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, तंबाखु ,गुटखा यापासून होणारे दुष्परिणामांची माहिती महेंद्र देवरे सरांनी व कोविड 19 ( करोना ) महामारी विषयी जनजागृती निलेश माधवराव पाटील, निलेश पाटील, एकनाथ सावकारे शिक्षक वृंद यांनी गावातील चौकात सर्व नागरिकांना दिली.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच गावचे सरपंच श्री उमेश सोनवणे, पोलीस पाटील श्री गजानन चौधरी,तसेच गावातील नागरिक मोठया संख्येने हजर होते.