जिल्ह्यातील मुख्याध्यापकाचा घटस्फोटित महिला शिक्षिकेवर चार वर्षे अत्याचार ; गुन्हा दाखल

एरंडोल क्राईम निषेध पाेलिस

एरंडोल प्रतिनिधी ::> २४ ऑगस्ट २०१९ रोजी लग्न करावयाचे आहे, असे सांगून मुख्याध्यापकाने पीडित शिक्षिकेला शिर्डीत बोलावले. तेथील हॉटेल वर्धमानमध्ये तिच्यावर अत्याचार केले.

तुझे कोणाशीही लग्न होऊ देणार नाही? अशी धमकी देत महिला शिक्षिकेकडून पैसे उकळले. तिचे एटीएम कार्ड देखील स्वत:जवळ ठेऊन घेतले. एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापकाने तो राहत असलेल्या असलेल्या अष्टविनायक कॉलनीतील भाड्याच्या खोलीत शिक्षिकेला बोलावून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सविस्तर माहिती अशी की, लग्नाचे आमिष दाखवून विवाहित मुख्याध्यापकाने सहकारी घटस्फोटित शिक्षिकेबरोबर शारीरिक संबंध ठेऊन चार वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार एरंडोल तालुक्यातील नंदगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या तक्रारीनुसार मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंदगाव (ता.एरंडोल) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महावीर गोविंदराव भिंगोले यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षिकेस लग्नाचे आमिष दाखवले. २ ऑक्टोबर २०१६ ते २३ ऑगस्ट २०१९ असे सुमारे चार वर्षे शारीरिक संबंध ठेऊन अत्याचार केले.

यादरम्यान मुख्याध्यापकाने शारीरिक संबंधाचे मोबाईलमध्ये चित्रण केले. शिक्षिकेचे अश्लील फोटो काढले, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणातील मुख्याध्यापक महावीर भिंगोला हा विवाहित असून पीडित शिक्षिका घटस्फोटित आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, हवालदार मिलिंद कुमावत तपास करत आहे. हे प्रकरण उघडकीस येताच तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली.