सर्प पकडण्याचे धाडस युवकाच्या आले अंगलट

क्राईम नंदुरबार शहादा

शहादा प्रतिनिधी ::> तालुक्यातील लोणखेडा येथे सर्प पकडण्याचे धाडस करणाऱ्या सोळा वर्षाच्या मुलाला सापानेे दंश केला. सुदैवाने या मुलावर वेळीच उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला.

लोणखेडा येथील एका दुकानात साप असल्याची माहिती मिळाल्याने जुनेद शेख, राहुल शर्मा, विनोद सोनवणे हे तिन्ही मित्र या ठिकाणी गेेले. त्यानंतर त्यांनी आम्ही सर्पमित्र आहोत अशी खोटी माहिती दिली. त्यानंतर दुकानात प्रवेश केला. या वेळी जुनेद शेख याने सर्पाचे डोके धरले. त्याच वेळी सापाने त्याच्या हातावर दंश केला.

हा प्रकार पाहून जुनेद शेखचे दोन्ही मित्र पसार झाले. त्यानंतर जुनेद शेखला लागलीच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. दरम्यानच्या काळात अन्य सर्पमित्र भीमा रावताळे व स्वप्निल इंगळे यांना बोलावून साप पकडण्यात आला.

दरम्यान, प्रशिक्षण घेतल्याशिवाय कुणीही सर्प पकडू नये, असे आवाहन सर्पमित्र भीमा रावताळे व स्वप्निल इंगळे यांनी केले आहे.