तापी पुलावरून उडी घेत न्हावी येथील युवकाची आत्महत्या

तापी यावल

यावल प्रतिनिधी ::> तापी पुलावर दुचाकी लावून न्हावी येथील युवकाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना, गुरूवारी सकाळी ८.३० वाजेपुर्वी घडली. विरेंद्र रामा कोळी (वय ४०) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर तापी पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट असल्याने ओळख पटवण्यात अडचणी आल्या. शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.

मृतदेह बाहेर काढल्यावर यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हवालदार मोहंमद अली सय्यद, विशाल साळुंखे, चंद्रशेखर गाडगीळ हे घटनास्थळी हजर होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात धनराज कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *