तापी नदीत महिलेचा पाय घसरून मृत्यू…

क्राईम तापी रावेर

रिड जळगाव >> नेहता तालुका रावेर येथे तापी नदीत पाय घसरून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत रावेर पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत वृत्त असे की नेहता( ता रावेर) मयत भारताबाई कोळी (वय ३५) ही पाती नदित घरातील पूजेचा सामान टाकण्यासाठी गेली होती अचानक तिचा पाय घसरून तोल गेल्याने तापी नदित बुडून मृत्यु झाला आहे.

मयत महीलेला मूल एक मुलगी आहे.या बाबत रावेर पोलिसात अकास्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.