हळदीच्या कार्यक्रमात तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणास अटक

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> हळदीच्या कार्यक्रमात दहशत माजवत हातात तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

प्रमोद शरद इंगळे (वय २६, रा. हरिविठ्ठलनगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. इंगळे हा काही दिवसांपूर्वी हरिविठ्ठलनगर भागात हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा तो हातात तलवार घेऊन बाजार पट्टयाजवळ आरडाओरड करुन दहशत माजवत होती. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पंकज शिंदे, प्रदीप पाटील, गोरखनाथ बागुल, महेश महाजन, विजय पाटील यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ हजार रुपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पंकज शिंदे यांच्या फियार्दीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.