भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांना कोरोनाची लागण

जळगाव प्रतिनिधी >> जळगावचे आमदार तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जळगावचे आमदार तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे. आ. राजूमामा भोळे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार […]

Read More

गिरणा नदी पात्रातून अवैध वाळुचा उपसा तर भडगाव तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष

कोठली ग्रा.पं.चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रिड जळगाव प्रतिनिधी >> भडगाव तालुक्यातील कोठली गिरणा नदी पात्रातून काही दिवसांपासुन अवैध वाळुचा उपसा होत आहे. तहसिल प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने तक्रारी करुनही दुर्लक्ष होत आहे. तरी अवैध वाळु उपसा रोखावा. अन्यथा रस्त्यावर आत्मदहन करु या ईशार्याचे लेखी निवेदन कोठली ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचेसह इतरत्र दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले […]

Read More

शिंदखेडा तालुक्यातील अजंदे गावात विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे >> शिंदखेडा तालुक्यातील अजंदे बुद्रूक गावात महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी ५० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, घरासमोरील पोल वाकल्यामुळे तो धोकेदायक आहे. बाजूला करा असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे मिलिंद शांताराम भावसार, हिरामण भावराव पाटील यांनी दमदाटी […]

Read More

वर्डी येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

वर्डी तालुका चोपडा >> येथे शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिवप्रेमी यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात महाराजांचा मूर्तीचा अभिषेक करून करण्यात आली. गावातील माजी सरपंच नंदलाल निंबा पाटील, उपसरपंच उज्वल शिंदे यांनी अभिषेक केला व पूजन संदीप धनगर, दीपक सुलताने, दत्तात्रय पाटील, लहुष धनगर यांनी केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज […]

Read More

जळगावात मंडप व्यावसायिकाने केली आत्महत्या ; मुलीलाच दिसला गळफास घेतलेल्या अवस्थेत पिता!

जळगाव >> शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मंडप व्यावसायिक संतोष पाटील (वय ४०) हे झोपेतून उठले. आंघोळीसाठी त्यांनी पाणी गरम करण्यासाठी ठेवले. दरम्यान रिंग वाजल्याने मोबाईल सोबत घेऊन वरच्या मजल्यावर गेले. बराच वेळ झाल्यानंतरही ते खाली न आल्याने त्यांची मुलगी प्रियंका ही त्यांना बोलविण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता तिला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. यांनतर […]

Read More

धानो-यात सहा विशेष पोलिस अधिकारी बजावताय कर्तव्य

दोन तरुणींचा समावेश. कोरोना बाबत जनजागृती  धानोरा ता. चोपडा (वार्ताहर ) प्रशांत चौधरी >> चोपडा तालुक्यातील धानोरा गावात सहा विशेष पोलिस अधिकारी स्वंयस्फुर्तीने कोरोना बाबत कर्तव्ये बजावतांना दिसत आहेत.तसेच कोरोना बाबत अधिकची जनजागृती करतांना दिसत आहे.विशेष म्हणजे या ०६ जणांमध्ये दोन तरुणींचा समावेश असल्याने रस्त्यावर फिरणा-या टारगट तरुणांचा गट गायब झालेला आहे.     कोरोना […]

Read More

नारायण राणें सेनेमुळेच मोठे अन सेनेमुळेच आले रस्त्यावर : गुलाबराव पाटील

जळगाव : > कोरोना हा काही महाराष्ट्राने आणलेला नाही. सर्वत्र जगात व देशात हा संसर्ग पसरला आहे. ही आपत्ती आहे, त्याला सामोरे गेले पाहिजे. काही त्रुटी असतील तर त्याला सामोरे गेले पाहिजे. कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशावर मोठी आपत्ती निर्माण केली आहे. राष्ट्रपती लागवट लावावीच असेल तर गुजरात, उत्तर प्रदेश व दिल्ली पण आहे, तेथेही […]

Read More

राज्यात टाळेबंदी वाढण्याची शक्यता

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील टाळेबंदी ३१ मे पर्यंत वाढविण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू झाला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात निर्बंध कायम ठेवत काही प्रमाणात दिलासा देण्याची योजना आहे. तसेच आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. टाळेबंदीबाबत केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाल्यावरच राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. चौथ्या टप्प्यातील […]

Read More

मी अर्ज भरला असता तर भाजपचे सात आमदार फुटले असते; खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव > विधानपरिषद उमेदवारी निवडीसाठी निवडणूक होवून उमेदवारांची निवड झाली. या विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी कॉंग्रेसकडून ऑफर होती. कॉंग्रेसची उमेदवारी घेवून अर्ज भरला असता तर कदाचित भाजपच्या आमदारांनी मला वोटींग केले असते. या पाच ते सात आमदारांनी तसे स्वतः माझ्याकडे बोलून दाखविल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. विधानपरिषदेच्या उमेदवार निवड प्रक्रिया नुकताच पार पडली. यात भाजपने […]

Read More

भारतातील कोणते रेल्वे स्टेशन आहे जेथे एकाच बाकावर बसलेले लोक दोन वेगवेगळ्या राज्यात आहेत?

देशातील सर्वात अद्वितीय रेल्वे स्टेशन, एकच बेंच दोन राज्यात विभागले गेले आहे हि कहाणी आहे एका अश्या रेल्वे स्टेशनची जिचा एक भाग महाराष्ट्रात आहे व दुसरा गुजुरात मध्ये. दोन राज्यांच्या वेगवेगळ्या हद्दीत वसलेल्या या स्टेशनमध्ये काय विशेष असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. चला सांगतो…वास्तविक, हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे जे गुजरात-महाराष्ट्र सीमेला स्पर्श […]

Read More

राज्यात कोरोनाचे २११५ रुग्ण बरे होऊन घरी…

राज्यात आज ६७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १२ हजार ९७४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण १० हजार […]

Read More
read-jalgaon

संघर्ष वाहन चालक संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन..

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व वाहन चालकांना आर्थिक सहकार्य देण्याकरीता संघर्ष वाहन चालक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.सध्या जगभर चालू असलेल्यां कोविड-19(कोरोना विषाणू) या रोगामुळे संपूर्ण भारत देश लॉकडाऊन असल्यां कारणाने महाराष्ट्रातील सर्व वाहन चालक घरीच बसून आहेत. त्यामुळे या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि या भयंकर संकटामुळे, पोटाचं साधन […]

Read More

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बीयाणे व खते पुरविण्याचे नियोजन – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शेतकरी गट/उत्पादक कंपन्यांमार्फत बी-बीयाणे व खते बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बीयाणे व खते वेळेवर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असली तरी त्यांनी बागायती कापसाची लागवड 25 मे नंतरच करावी. तसेच बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज तातडीने उपलबध करुन द्यावे. असे […]

Read More

डायलिसीसचे रूग्ण जीवनमरणाच्या उंबरठ्यावर

नवापूर : संचारबंदी अन कोरोना डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णाच्या जिवावर उठली आहे. आतापर्यंत उपचार करणारे गुजरातचे दवाखाने महाराष्ट्रच्या रुग्णांना सेवा देण्यास तयार नाही. महाराष्ट्रातील वैद्यकीय सेवा देणारी व्यवस्था या रुग्णांना अपमानित करून परत पाठवित आहेत. तात्काळ डायलिसिस न झाल्यास या रूग्णांच्या जीवावर बेतणार आहे, हे माहीत असूनही नंदुरबारचे जिल्हा शल्य चिकित्सकांची या रूग्णांशी वर्तणूक संतापदायी आहे. […]

Read More
read-jalgaon

जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आतापर्यंत 53 लाख 65 हजार रुपयांची मदत

जळगाव – कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सहकारी तसेच शैक्षणिक संस्थांनी प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकूण 53 लाख 64 हजार 933 रुपयांची मदत केली. देणगी देणाऱ्या संस्था आणि त्यांच्याकडून प्राप्त रकमा पुढील प्रमाणे.. राजाभाऊ मंत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.कासोदा ता.एरंडोल रक्कम रुपये 2 लाख […]

Read More