भुसावळात महिलेसह पाच जणांची अत्याचारप्रकरणी चौकशी

भुसावळ प्रतिनिधी >> मध्य प्रदेशातील खरगोन येथील ३५ वर्षीय महिलेवर भुसावळात सोमवारी (दि.२२) रात्री एका तरुणाने अत्याचार केले होते. या आरोपीच्या तपासासाठी तीन पोलिस पथके सक्रिय आहेत. गुरुवारी एका महिलेसह पाच संशयितांची चौकशी करण्यात आली. खरगोन येथील ३५ वर्षीय महिला भुसावळात आली होती. एका अनोळखी तरुणाने तिला दुचाकीवरून ट्रामा केअर सेंटर मागील निर्जन स्थळी नेत […]

Read More

मुक्ताईनगरजवळ कार-ओमनीच्या अपघात ; चालकासह सात मजूर जखमी

मुक्ताईनगर >> शहरापासून जवळ मुक्ताईनगर ते मलकापूर रोडवरील रक्षा पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या ओमनी गाडीला मलकापूरकडून येणाऱ्या स्विफ्ट कारने मागून जोरदार धडक दिली. रविवारी दुपारी झालेल्या या अपघातात मजूर व चालक मिळून ७ जण जखमी झाले. तालुक्यातील डोलारखेडा येथील गुलाब पाव्हन इंगळे यांनी शेती कामासाठी तसेच मजुरांना ने-आण करण्यासाठी ओमनी गाडी घेतली आहे. रविवारी […]

Read More

भुसावळ-वांजोळा गावात पाच वर्षीय मूकबधिर मुलीवर अत्याचार

भुसावळ >> तालुक्यातील वांजोळा येथे एका पाच वर्षीय मूकबधिर बालिकेवर तिच्याच नात्यातील ३० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित मंगल भील यास तात्काळ अटक केली आहे. बालिका घरी एकटी असताना नराधमाने तिला सायकलवर बसवत स्वत:च्या घरी आणून अत्याचार केला. याच […]

Read More

आयपीएस कुमार चिंथा यांनी घेतला भुसावळचा पदभार

भुसावळ ::> येथील डीवायएसपी गजानन राठाेड यांची नवी मुंबई येथे बदली झाल्याने, भुसावळ विभागाचा पदभार मंगळवारी आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांनी स्विकारला. तालुका, बाजारपेठ आणि शहर पाेलिस ठाण्याला भेट देऊन त्यांनी पाेलिस ठाण्यांची पाहणी केली. सहायक पाेलिस अधीक्षक कुमार चिंथा हे मंगळवारी भुसावळात दाखल झाले. डीवायएसपी कार्यालय गाठून त्यांनी तालुका पाेलिस ठाण्याची पाहणी केली. यावेळी […]

Read More

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून पकडला!

भुसावळ रिपोर्टर ::> तालुक्यातील सिंधी, खडका आणि सुनसगाव येथील तलाठी महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून वाळूचा ट्रक पकडल्याची घटना आज दुपारी नहाटा चौफुली ते खडका चौफुली दरम्यान घडली. ट्रक मालकास तब्बल अडीच लाखाचा दंड आकारण्यात आला असून या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सिंधी गावाच्या तलाठी साधना खुळे, […]

Read More

१९ दिवसांनी भुसावळ पुन्हा हादरले ; खडका रोडवर चाकूने भोसकून युवकाचा खून!

प्रतिनिधी ::> भुसावळ शहरातील बाबला हॉटेल परिसरातील रहिवासी १९ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना, खडका रोडवरील निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. २५ ऑगस्टला श्रीरामनगरानगरात अभियंता युवकाची गोळीबारात हत्या झाली होती. त्यानंतर १९ दिवसांच्या अंतरात पुन्हा खुनाच्या घटनेचे भुसावळ शहर हादरले. अल्लमस शेख रशीद असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर अज्ञात संशयितांनी […]

Read More

भुसावळात मास्क न लावताच भाजीपाल्याची विक्री

भुसावळ >> शहरात कोरोनाचा कहर सुरू असतांही अनेक विक्रेते तोंडाला मास्क न लावता फळे, भाजीपाल्याची विक्री करतात. तोंडाला मास्क न लावता ते मास्क हनुवटीवर टांगून विक्रेते फिरतात. त्यामुळे पालिकेच्या पथकांनी संबंधित विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्यास यास आळा बसणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कारवाई आवश्यक आहे.

Read More

धक्कादायक बातमी : जिल्ह्यात जळगावसह भुसावळने ओलांडली दोनशे पंधरा पेक्षा जास्त रुग्णांची पातळी

मनु निळे जळगाव >> जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव जळगाव-भुसावळ शहरात होत आहे. जिल्ह्यात आज नव्याने ९० च्या जवळपास कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले असुन रूग्ण संख्या १०२० पेक्षा जास्त झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तर जळगाव आणि भुसावळ या दोन्ही ठिकाणी २१० पेक्षा अधिक रूग्ण आढळुन आले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. […]

Read More

चिंताजनक बातमी ; जळगाव जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित रुग्ण आढळले, रुग्णसंख्या ९५७ वर

जळगाव >> जळगाव जिल्ह्यात महिनाभरात कोरोनाने चांगलेच थैमान घातले असून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून जळगावकरांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. आज दुपारी ३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असताना आणखी नव्याने १२ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या ही ९५७ इतकी झाली आहे. तसेच जामनेर २, चोपडा ३, जळगाव २, धरणगाव १, यावल […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आज आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले…

अमळनेर येथील पंधरा अहवाल निगेटिव्ह…जिल्ह्यातील आज 177 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह… जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव, यावल, भुसावळ, जामनेर, अमळनेर, रावेर, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या 180 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.पैकी 177 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती या जळगावातील सुप्रीम काॅलनी, शिवाजी […]

Read More

जळगाव जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 235 जळगाव;- जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 52 कोरोना संशयित व्यक्तीचे स्वॅब नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 49 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील माता आश्रम येथील एक, अमळनेर येथील […]

Read More

फैजपुरात कोरोनाचा शिरकाव ; परिसरात खळबळ

फैजपूर > आजवर कोरोनाचा एकही रूग्ण नसल्याने निर्धास्त असलेल्या फैजपुरकरांना १४ मे रोजी एक बाधीत रूग्ण आढळून आल्याने धक्का बसला आहे. दरम्यान, रूग्णाचा रहिवास असणार्‍या भागात प्रशासनाने सील करण्यास प्रारंभ केला असून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याबाबत माहिती अशी की, १४ मे रोजी सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये फैजपूर येथील एक रूग्ण बाधीत असल्याचे वृत्त […]

Read More

जळगाव जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

जिल्ह्यात आतापर्यंत 210 कोरोना बाधित रूग्ण आढळले जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 – जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, अडावद, चोपडा येथील स्वॅब घेतलेल्या 24 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 23 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एक व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती भज्जेगल्ली, भुसावळ येथील 34 […]

Read More

जळगाव जिल्ह्यात आज आणखी दहा कोरोना बाधित रूग्ण आढळले ; संख्या २०९ वर…

जिल्ह्यात आतापर्यंत 209 कोरोना बाधित रूग्ण आढळले जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 – जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, धरणगाव, फैजपूर, जामनेर, चोपडा, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 92 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 82 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये आठ […]

Read More

भुसावळात तिसऱ्या दिवशीही तळीरामांची वाईन्स शॉपवर गर्दी; नियमांची पायमल्ली

भुसावळ : शहरातील वाईन्स दुकाने अटी शर्तीवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या दिवशी मद्यविक्रेत्यांच्या दुकानासमोर तळीरामांची मोठी गर्दी जमली असून लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन होत आहे. आयुक्त व जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य परवाना धारकांना सहा मीटर सोशल डिस्टनसींग ठेवणे. पाच व्यक्तींच्यापेक्षा जास्त नको. काउंटरवर तीन व्यक्ती हवे. सर्वांनी मास्क लावणे […]

Read More

‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’ ! कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केल्या भावना

जळगाव जिल्ह्यातील दुसरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला जळगाव : ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’ ! अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंगसे, ता. अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेचे 14 दिवसांच्या उपचाराअंती शेवटचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी पाठविण्यात आले. कोरोनावर मात करणाऱ्या त्या जिल्ह्यातील दुसऱ्या तर पहिल्याच महिला […]

Read More

जळगाव जिल्ह्यात आज ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव – जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 43 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 39 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 59 वर्षीय पुरुष, अडावद, ता. चोपडा येथील 58 वर्षीय पुरुष, नेहरुनगर, जळगाव येथील 75 वर्षीय पुरुष तर अमळनेर येथील […]

Read More

फैजपूरातील जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस बंदच ठेवावे ; सुज्ञ नागरिकांकडून मागणी

मयुर मेढे । फैजपूर, कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानंतर शहरातील सुभाष चौक येथील जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस येथे तळीरामांच्या अक्षरशः उड्या पडताना दिसत आहे. जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस समोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या तळीरामाच्या गर्दीत विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शहरातील वातावरण बिघडल्यास […]

Read More
read-jalgaon

लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ उपक्रम – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे

जळगाव – लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना परवानगी नसल्याने नागरीकांची अडचण होवू नये तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे याकरीता शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली. जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी […]

Read More

जिल्ह्यात 17 मे पर्यंत 144 कलम जारी

जळगाव :- देशात आणि राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या 02 मे 2020 रोजीच्या आदेशान्वये लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत संपुर्ण जिल्हा हद्दीत 17 मे 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 जारी करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या […]

Read More