आमदारांच्या मध्यस्थीने मिटवलेल्या लाच प्रकरणाची चौकशी होणार

जळगाव प्रतिनिधी ::> जिल्हा परिषदेच्या तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांकडून बदलीसाठी घेतलेली लाच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मध्यस्थीने परत केल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात लाच घेतल्याचे उघड झाल्याने रवींद्र शिंदे यांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती. त्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी दिले. […]

Read More