सुनील चौधरी यांची तेली समाजाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी निवड

Social कट्टा कट्टा धरणगाव

धरणगाव >> येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पंढरीनाथ चौधरी यांची तेली समाज महासभेच्या पश्चिम जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. अखिल भारतीय तेली समाज महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे युवा आघाडीचे महासचिव सुरेंद्र वंजारी तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे काैतुक केले जात आहे. पश्चिम कार्यक्षेत्रात जळगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर व चोपडा या तालुक्यांचा समावेश येतो.