पुणे >> औरंगाबाद येथील काकाकडे सुटीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा सख्ख्या चुलत्याने विनयभंग करत तिच्याशी शारीरिक जवळीक साधल्याचा प्रकार घडला. चुलता अश्लील मेसेज पाठवून त्रास देत असल्याने मुलीने आत्महत्या केली.
याप्रकरणी गौरव सोपान नारखेडे (३०, रा. सिडको औरंगाबाद) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडिता एप्रिल २०१८ मध्ये सुटीत औरंगाबाद येथे काकाकडे गेली होती. मात्र, काकाने तिचा विनयभंग केल्याने ती भोसरीच्या घरी परतली. मात्र, त्यानंतरही काका तिला अश्लील मेसेज करून त्रास देत होता. त्यामुळे तिने घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आात्महत्या केली.