साक्री ::> तालुक्यातील निजामपूरपासून जवळ असलेल्या खुडाणे गावातील प्रवीण लक्ष्मण खैरनार ( वय २८) या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला अत्यवस्थ स्थितीत जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. तपासणी करून डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केले. या प्रकरणी संदीप न्हानू खैरनार यांनी दिलेल्या माहितीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली. लग्नकार्यात अडचणी येत असल्यामुळे प्रवीणने नैराश्यातून आत्महत्या केली, असे पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद आहे.