चोपडा तहसीलदारांना लाल बावटा युनियनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

Politicalकट्टा आंदोलन कट्टा चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> शेतकरी, शेतमजूर, वयोवृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग यांचे चार महिन्यांचे थकीत मानधन फारकासह दिवाळीपूर्वी अदा करा आदी मागण्यांचे निवेदन चोपडा तालुका तहसीलदार छगन वाघ यांना लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे देण्यात आले.

शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या दिवाळीला तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला अमृतराव महाजन शांताराम पाटील यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.