चिलगाव येथील सभा मंडप परिसरात अतिक्रमण विरोधात मनसे चे निवेदन

जळगाव रिड जळगाव टीम

जळगाव , भुषण जाधव ::> ४ नोव्हेंबर रोजी मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी चिलगाव ग्रा प चे ग्रामसेवक पाटील मॅडम यांना सभा मंडप परिसरातील अतिक्रमण काढणे व दुर्गंधी बाबत निवेदन देण्यात आले.


चिलगाव गावात नुकते च बांधण्यात आलेल्या मंगलकार्यालया च्या पश्चिम दिशेने जुलाल नामदेव पाटील यांच्या घराच्या मागच्या बाजूने काही जागा सोडल्याने त्या जागेत काही अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य उभे होत असल्याने प्रथम दर्शनी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो.


गावासाठी इतकी अप्रतिम वास्तू बनवली जात असतांना ती स्वच्छ व दुर्गंधी मुक्त कशी राहील यावर ग्रा प ने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे ,म्हणून मी चिलगाव येथील सामाजिक कार्याची जाण म्हणून भविष्यात या वास्तू सोबत इतर घाणीचे एकाच वेळी उद्घाटन होऊन गावाची,ग्रा प ची बदनामी होऊ नये हे आपल्या लक्षात आणून देण्यासाठी मला ही धडपड करावी लागत आहे.


आशा आहे माझा विषय आपल्या लक्षात आला असेल त्यामुळे त्या मंगलकार्यालय परिसरातील अतिक्रमणे व शौचालय युक्त घाणीची विल्हेवाट लावाल अशी आशा व्यक्त करतो.


सदरील अतिक्रमण व घाणीचे व दुर्गंधी चे तात्काळ नियोजन न झाल्यास कोरोना परिस्थितीचे भान लक्षात घेऊन ,सॅनिटायझर ,मास्क ,व सामाजिक अंतर लक्षात घेऊन पंचायत समितीच्या दालनात उपोषणाला बसणार असा मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी प्रशासनाला दिला यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील ,तालुका सचिव अनिल मोरे ,वाल्मिक कोळी ही उपस्थित होते.