राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज दुपारी दीड वाजता अमळनेरात

Politicalकट्टा अमळनेर कट्टा

अमळनेर प्रतिनिधी ::> राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी अमळनेर दौऱ्यावर येत आहेत. शहादा येथून हेलिकॉप्टरने १ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता गृहमंत्री देशमुख यांचे अमळनेरकडे प्रयाण होईल. ते दुपारी सव्वादोन वाजता प्रताप महाविद्यालयातील हेलिपॅडवर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासन तयारीला लागले आहे. ते ज्या मार्गाने येणार आहेत, त्या मार्गाची दुरुस्ती केली जात आहे.

आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी व त्यानंतर ढेकू रोडवरील पोलिस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ते उद्घाटन करणार आहेत. दुपारी ३.५० वाजता पालिकेच्या जिजाऊ महिला व्यायाम शाळा व सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे ते उद्घाटन करतील. नंतर दुपारी ४.१५ वाजता ते मुंबईकडे प्रयाण करतील.