पुणे, मुंबईला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्या

पुणे भुसावळ महाराष्ट्र

भुसावळ >> रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी पहाता रेल्वे प्रशासनाने पुणे-जम्मूतवी आणि मुंबई-फिरोजपूर या दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवासाला मदत होईल. जागेचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल.

०१०७७ डाऊन पुणे-जम्मुतवी विशेष गाडी १ डिसेंबरपासून पुणे स्टेशनवरून दररोज सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी जम्मुतवीला सकाळी १०ला पोहोचेल. ही गाडी चाळीसगावला १२.८, पाचोरा रात्री १२.३८, जळगावला रात्री १.२०, भुसावळला रात्री १.५०, तर ०१०७८ अप जम्मुतवी-पुणे विशेष गाडी ३ डिसेंबरपासून सुरू होईल. ती दररोज जम्मुतवी स्टेशनवरून रात्री ११.४० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पुणे येथे दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल. तसेच ०२१३७ डाऊन मुंबई-फिरोजपूर ही विशेष गाडी १ डिसेंबरपासून मुंबई स्टेशनवरून दररोज सायंकाळी ७.३५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ५.१० वाजता फिरोजपूरला पोहोचेल.