भुसावळ ::> नवीन सहा विशेष रेल्वे गाड्या गोरखपूर मार्गावर प्रवाशांच्या सेवेत येत आहेत.
एलटीटी-गोरखपूर
एलटीटी-गोरखपूर विशेष गाडी २९ सप्टेंबर पासून दर मंगळवारी सायंकाळी ५.५० वाजता सुटणार अाहे. ही गाडी बुधवारी भुसावळ विभागात येणार आहे. ही गाडी भुसावळ, खंडवा, हरदा, विदिशा, झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, बलरामपूर, झारखंडी, तुलसीपूर, बरहनी, आनंदनगर या ठिकाणी थांबेल. अप मार्गावर ही गाडी गोरखपूर येथून २८ सप्टेंबरला दर सोमवारी सकाळी ५.३० वाजता सुटेल.
पनवेल-गोरखपूर
ही विशेष गाडी पनवेल स्थानकावरून ३० सप्टेंबरपासून दर बुधवारी सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, हबीबगंज, विदिशा, झांशी, कानपूर सेंट्रल येथे थांबा आहे. अप मार्गावर ही गाडी गोरखपूरहून २८ सप्टेंबरला सोमवारी पहाटे सुटेल.
बांद्रा टर्मिनस-गोरखपूर
ही गाडी २ ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी सुटणार आहे. अप मार्गावर ही गाडी गोरखपूर येथून ३० सप्टेंबरला दर बुधवारी पहाटे सुटेल.