कारवाईमुळे मास्कचा वापर वाढला; दहा दिवसांपासून रुग्ण नाही

Social कट्टा कट्टा धुळे माझं खान्देश

सोनगीरला कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी प्रयत्न

प्रतिनिधी सोनगीर ::> लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. पण अनेक जण मास्क लावत नसल्याने कोरोनाचा फैलाव वाढला हाेता. त्यानंतर ग्रामपंचायत व पोलिसांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. त्यामुळे आता अनेकांनी मास्कचा वापर सुरू केला आहे. दुसरीकडे गावात गेल्या दहा दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही.

गेल्या दोन महिन्यांत गावात कोरोनाचे ९१ रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून, ८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गावात अॉगस्ट अखेर व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. त्यानंतर ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे अाता अनेक जण मास्क लावूनच घराच्या बाहेर पडतात. आठवडाभरात १०० जणांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून २०० रुपयांप्रमाणे २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे व सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.

संसर्ग नियंत्रणात…
गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाने वेळीच खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर बंधनकारक केला. पोलिस व ग्रामपंचायतीने नियम मोडणाऱ्यांवर सतत आठ दिवस कारवाई केली. त्यामुळे नागरिकांना शिस्त लागण्यास मदत झाली आहे. फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग काहीअंशी कमी होण्यास मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *