चुंचाळे येथील कैलास लोहार सेवानिवृत्त सुनिल नेवे एकता फाऊंडेशनच्या वतीने चुंचाळ्यात होणार सन्मान

Social कट्टा


चुंचाळे ता.यावल येथील कैलास वनीलाल लोहार संन 1999 मध्ये चुंचाळे तालुका यावल या छोट्याशा गावातून पहीले भारतीय सेने मध्ये सामील झाले यांचे प्राथमिक आणी उच्च माध्यमिक शिक्षण चुंचाळे, साकळी, यावल आणी भुसावळ येथे पूर्ण केले. मनामध्ये लहान पणा पासून देश सेवेची आस्था होती ते स्वतंत्र भारताचे पहिले फौजीचा मान म्हणून चुंचाळे गावात प्रसिद्ध आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळात अहमदनगर येथे आपले प्रशिक्षण घेवून त्यांची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मिर येथे घेवून 2001 ओ.पी.पराक्रम मध्ये उल्लेखनीय कार्य बजावले होते त्या नंतर त्यांनी पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, हरयाणा, युपी येथे अशी आपली भारताच्या कानाकोपऱ्यात 21 वर्ष सेवा देऊन नायब सुबेदार क्लर्क या पदावरून 31 जुलै 2020 रोजी सेवानिवृत्त (रिटायर) होत आहे त्यांच्या या सर्व संघर्ष मय जीवनात आई सुंनदा व वडील वनलाल लोहार,पत्नी रुपाली लोहार तसेच बोराळे येथील युवराजसिंग राजपूत,दारासिंग राजपूत, इस्माईल सिकदंर तडवी,राजू सोलंकी,माजी सरपंच कै. जिजाबराव भाऊलाल पाटील, काका भागवत सनंसे मित्र प्रकाश चौधरी, संतोष चौधरी, रवींद्र पाटील, नितीन पाटील ,साकळी अरविंद नीळे हेमंत जोशी व चुंचाळे बोराळे ग्रामस्थ यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यांचे चुंचाळ्यात श्री सुनिल नेवे एकता फाऊंडेशन च्या वतीने गावात आल्यावर सोशल डिस्टनचे पालन करुन सन्मान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *