चाळीसगाव प्राईम फोकसचे संपादक स्वप्नील वडनेरे यांना ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर

Social कट्टा कट्टा

चाळीसगाव (राज देवरे): चाळीसगाव प्राईम फोकसचे संपादक स्वप्नील वडनेॆरे यांच्या पत्रकारित क्षेत्रातील कामाबद्दल दखल घेत MSEMA संस्थेकडून आज सकाळी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

MSEMA पिंपरी चिंचवड, पुणे येथील सामाजिक संस्थेकडून पत्रकार क्षेत्रातील काम करणाऱ्या पत्रकारांची दखल घेत स्वप्निल वडनेरे यांची निवड करण्यात आली स्वप्नील वडनेरे यांनी प्राईम फोकस मधून प्रसिद्ध केलेल्या चाळीसगावच्या सुदामा आणि डोंबार्याचा दोरीवरचा संसार या स्टोरीच्या संस्थेने दखल घेत चाळीसगांवचा सुदामा या स्टोरी साठी ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून जाहीर करण्यात आले MSEMA चे अध्यक्ष सुयोग राजपूत व सचिव स्वाती चिरमडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वप्निल वडनेरे यांना सांगण्यात आले.

Readजळगावच्या टीमने स्वप्नील वडनेरे विचारले असता “प्रामाणिक पत्रकारिता आणि आपल्या कामाची दखल नक्कीच कोणी तरी घेत असते पडद्यामागचे व्यू दाखवणे हे आपले कर्तव्य आहे या संस्थेचे मी आभारी राहील पुढील काम करण्यास अजून उत्सुकता आणि उभारी मिळाली” पुढील वाटचालीसाठी रिड जळगाव परिवारा कडून स्वप्निल वडनेरे यांना खूप खूप शुभेच्छा.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *