यावल ग्रामीण रुग्णालय

यावल तालुक्यातील युवकाला सर्पदंश

अपघात क्राईम यावल

यावल >> तालुक्यातील बोरखेडा येथील २६ वर्षीय गुराखी युवकाला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. जुम्मा न्याहरू तडवी असे या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर यावल ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी तो तो गुरे चराईसाठी जंगलात गेला होता. त्याच्या डाव्या पायाला सापाने दंश केला. यावल ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, अधिपरिचारीका नेपाली भोळे, आरती कोल्हे, सुमन राऊत, विजय शिंदे आदींनी त्याच्यावर उपचार केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती स्थिर आहे.