भुसावळ ::> रविवारी (दि.११) दुपारी १ वाजता वरणगाव येथील हनुमान नगरातील अभ्यासिका हॉलमध्ये शिवसेनेची बैठक होणार आहे. रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर यांची उपस्थिती असेल. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.
