रावेरात शिवसेनेची उद्या जिल्हा बैठक ; संपर्कप्रमुख येणार

Politicalकट्टा कट्टा जळगाव जिल्हा निवडणूक रावेर

रावेर >> शिवसेना जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक शुक्रवारी शहरात आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी दुपारी २ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, आंबेडकर मार्केट येथे ही बैठक होईल. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित राहणार आहेत.

बैठकीला आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आ, असे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे यांनी कळविले आहे.