या शहरातील नगरसेविकेची शिवसेनेला सोडचिठ्ठी

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा निवडणूक

चाळीसगाव >> येथील शिवसेनेच्या नगरसेविका व गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत असलेल्या विजया प्रकाश पवार यांनी शिवसेना तालुका महिला संघटक पदाचा राजीनामा दिला आहे.

शनिवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांना पाठवला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेला पाठींबा म्हणून आपण राजीनामा आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मी देखील शेतकऱ्याची मुलगी, पत्नी व बहिण आहे. आमदार चव्हाण व शेतकऱ्यांना झालेल्या अटकेमुळे मी व्यथीत झाली आहे. शेतकऱ्यांवर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर संघटनेच्या पदावर राहण्याचा मला नैतिक अधिकार नाही.

आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठींबा म्हणून मी तालुका महिला आघाडीचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.