अंगणात पाणी येत असल्याच्या रागात भावाने बहिणीच्या डोक्यात लोखंडी सळईने केला वार ; गुन्हा दाखल

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव निषेध पाेलिस शिरसोली

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे घरातील सांडपाणी अंगणात येत असल्याच्या कारणावरून भाऊ-बहिणी यांच्यात हाणामारी झाला. यात भावाने बहिणीच्या डोक्यात लोखंडी आसारी मारून गंभीर दुखापत केल्याची घटना आज १ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भावासह तीन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, शबनम जाकिर शेख (वय-४०) रा. बारी गल्ली, शिरसोली प्र.बो ह्या आपल्या मुलाबाळासह वास्तव्याला आहे. पती सौदी अरेबिया येथे इंजिनिअर आहेत. त्यांच्या शेजारी त्यांचा भाऊ जाकिर शमसोद्दीन पिंजारी हे पत्नी व मुलांसह राहतात. नेहमी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण होत असते.

आज १ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास भावाच्या घराच्या बाथरूमधून येणारे पाणी आमच्या अंगणात येत असल्याचा जाब बहिण शबनम यांनी भाऊ जाकीर याला विचारला. याचा राग आल्याने भाऊ जाकीर याने शिवीगाळ केली. हे पाहून जाकीरची पत्नी गुलशन पिंजारी आणि मुले दानीश पिंजारी, मुजीब पिंजारी यांनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली. तर जाकीरने घरात असलेला लोखंडी आसारी बहिण शबनम हिच्या डोक्यात हाणली. यात शबनम ह्या जखमी झाल्या त्यांना तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात भावासह, पत्नी व दोन मुलांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.