शिरसोलीत तिघांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी

Jalgaon क्राईम जळगाव पाेलिस शिरसोली

शिरसोली प्रतिनिधी >> जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शनिवारी सायंकाळी मटणाचे दुकान लावण्यावरून एकाने दुकानदारासह तिघांना शिवीगाळ करून मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली येथील रहिवाशी हनीफ भीकन खाटीक (वय-२९) हे गेल्या पाच वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्यावर मटन विकण्याचा व्यवसाय करतात.

नेहमीप्रमाणे शनिवारी २८ नोव्हेंबररोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुकान लावले. त्यावेळी गावातीलच हिरामण ईश्वर खलसे रा. शिरसोली प्र.न. ता.जि.ळगाव याने दुकानदार हनीफ खाटीक यांच्यासह सत्तार खाटीक व इम्रान खाटीक या तिघांना दुकान लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

शिवीगाळ केल्यानंतर याला विरोधात केला असता हिरामण याने तिघांना मारहाण केली. तर मटन कापण्याच्या हत्याराने जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

शनिवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात हनीफ खाटीक यांच्या फिर्यादीवरून हिरामण खलसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोउनि विशाल सोनवणे करीत आहे.