३७ किमी पायीवारी करुन नेली शिरागड ते कासवे गावी अंखड ज्योत

तापी यावल साकळी

मनवेल ता.यावल प्रतिनिधी ::> शिरागड येथील सप्तश्रूगी देवी मंदिरातून आज ( दि १७ ) रोजी अखंड ज्योत आणून यावल तालुक्यातील कासवे येथील सार्वजनिक दुर्गा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली.

शिरागड येथील श्री निवाशीनी सप्तश्रूगी मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत कासवे येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांनी ३७ किमी पायी जाऊन अंखड ज्योत नेली जाते. या मंडळाच्या दोनवर्षा पासुन अखंड ज्योत आणण्याचा उपक्रम पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या मंडळातील सर्व पदाधिकारी भक्त जवळपास ३७ किलोमीटर पायी जाऊन शिरागड येथून वाजत-गाजत व दुर्गा मातेच्या जयघोषात अखंड ज्योत आणत असतात. या अखंड ज्योत मिरवणुकीत मंडळाचे पंकज कोळी, पंढरी सपकाळे, सुकलाल बादशाह, अक्षय बावरे, आकाश सपकाळे, बाळु तायडे, संतोष सपकाळे, दिपक तायडे, रोशन तायडे ,रवि सपकाळे, दुर्गैश तायडे, रवि कोळी,कृणाल तायडे यांच्यासह अन्य भाविक सहभागी झाले होते .