शेतकऱ्यावर विळ्याने वार; तिघांवर गुन्हा

क्राईम धुळे महाराष्ट्र

धुळे ::> तालुक्यातील मुकटी गावाच्या शिवारात किरकोळ कारणावरून तरुण शेतकऱ्यावर विळ्याने वार करण्यात आला. या प्रकरणी जखमी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समाधान चिंधू पाटील (वय ३३) या तरुण शेतकऱ्याने तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार सामाईक बांधावर बैलांसाठी गवत कापत असताना निंबा दगडू पाटील, दगडू शिवराम पाटील, विजूबाई दगडू पाटील यांनी वाद घातला.

या वादातून शेतकरी समाधान पाटील व त्यांची आई जिजाबाई पाटील यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. तसेच समाधान पाटील यांच्या डोक्यावर विळ्याने वार करण्यात आला. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या प्रकरणी जखमी शेतकरी समाधान पाटील यांच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *