३२ वर्षीय महिलेचा विनयभंग; तिघांविरुद्ध गुन्हा

क्राईम जामनेर बोदवड

बोदवड >> शेंगोळा, ता. जामनेर येथील ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग व तिच्या पतीस मारहाण केल्याप्रकरणी तालुक्यातील जलचक्र येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ती जलचक्र येथील बहिणीच्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी विनयभंग केला, पतीस मारहाण केली, असे त्यात नमूद केले आाहे.