मुलासोबत जाणाऱ्या आईचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू ; मुलगा गंभीर जखमी

अपघात क्राईम बोदवड

बोदवड प्रतिनिधी >> तालुक्यातील शेलवड फाट्यावर मंगळवारी (दि.२४) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. त्यात मुलाच्या डोळ्यांदेखील आईचा मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक प्रसंग घडला.

भुसावळ येथील सुनील चौधरी हे आई मालतीबाई चौधरी यांच्यासह दुचाकीने शेलवड येथे द्वारदर्शनासाठी जात होते. यावेळी शेलवड फाट्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने त्यांना धडक दिली. त्यात मालतीबाई जागीच ठार, तर सुनील चौधरी हे गंभीर जखमी झाले.

सुनील सुधाकर चौधरी हे दुचाकीने (क्रमांक एमएच.१९-०२५६) आपली आई मालतीबाई सुधाकर चौधरी यांच्यासह पळासखेडा येथून शेलवड येथे दुचाकीने द्वारदर्शनासाठी जात होते.

शेलवड फाट्यावर अज्ञात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात मालतीबाई यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाने हयगय करत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने ही दुर्देवी घटना घडली.

दुचाकी चालक सुनील चौधरी हे देखील गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.

सुनील चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मृत मालतीबाई यांचे बोदवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. तर त्यांचा जखमी मुलगा सुनील पाटील यांचेवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. तपास उपनिरीक्षक भाईदास मालचे करत आहे.