महिलेस अश्लील शिवीगाळ करत केला विनयभंग ; गुन्हा दाखल

क्राईम निषेध बोदवड

बोदवड प्रतिनिधी >> शेलवड शिवारात कापूस वेचणाऱ्या दोन्ही महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी कृष्णा विश्वनाथ महाजन (रा.कापूसवाडी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील शेलवड येथील माहेर असलेल्या महिलेने याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार महिला तिचा पती व दोन मुलांसह इच्छापूर, ता. बऱ्हाणपूर येथे राहते. त्यांची वडिलोपार्जित शेत जमीन शेलवड शिवारात आहे.

आई-वडिलांचे निधन झाले असून त्या स्वतः व कापूसवाडी येथे राहणाऱ्या दोन बहिणी व एक भाऊ हे शेत जमिनीला वारस आहेत. भाऊ हा त्याच्या सासरचे लोक, त्याची पत्नी यांच्या घरगुती भांडणाच्या कारणामुळे दोन महिन्यांपासून घरातून निघून गेला आहे.

या शेतीवर त्यांच्या भाऊचे सासरे कृष्णा महाजन यांनी हक्क दाखवत अनधिकृतपणे शेती कामात हरकत अडथळे आणत आहेत. शुक्रवारी सकाळी फिर्यादी महिला व त्यांची बहीण हे शेतात कापूस वेचणी करत असताना कृष्णा महाजन यांनी, हे शेत माझ्या मुलीचे आहे, असे म्हणून महिलेस अश्लील शिवीगाळ केली. तसेच हाताला धरून शेता बाहेर काढले.

अश्लील शिवीगाळ केली. त्यांची बहीण सोडवण्यासाठी आली असता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दोघींना शेतातच गाडून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार कृष्णा महाजन याच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असून तपास कालीचरण बिऱ्हाडे करत आहेत.