साकळीच्या शारदा विद्या मंदिर शाळेच्या मुलींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी !

Social कट्टा कट्टा यावल साकळी

साकळी ता.यावल प्रतिनिधी >> शारदा विद्या मंदिर शाळेचा विविध परीक्षांचा निकाल लागलेला असून या परीक्षेत अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहे. त्यात शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी)-२०२० परिक्षेत एकूण १९ बसलेले विद्यार्थी होते. त्यापैकी १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरलेले आहे.

सदर परिक्षेत कु.चांदणी भालेराव, कु.दिक्षा वाघ, कु.डिंपल धनगर,कौस्तुभ बडगुजर, कु.लोचना मराठे,कु.मिताली बडगुजर, कु.नेहा धनगर, नूतन पुरी, कु.शितल बडगुजर, कु.सृष्टी चौधरी, कु.सृष्टी पवार, कु.उर्वशी शिरसाळे, कु.उत्कर्षा नाईक, कु.वैष्णवी मराठे, यज्ञेश बडगुजर हे विद्यार्थी पात्र ठरले आहे.

तसेच शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)-२०२० या एकूण ३४ बसलेले विद्यार्थी होते त्यापैकी एकूण १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहे.सदर परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थांमध्ये अथर्व माळी, कु.गायत्री पवार, कु.हर्षदा पाटील,कु.काजल बडगुजर, कु.लीना राजपूत,कु. ममता बडगुजर, कु.मनीषा पाटील, कु.निशा पवार, कु.पल्लवी माळी, कु.प्रेरणा सोनार, ऋषिकेश पाटील, कु.सानिया तडवी, उदय महाजन, यश मराठे, कु.योगिता इंगळे यांचा समावेश आहे.

दोघं परिक्षांमध्ये तब्बल २३ मुली यशस्वी झालेल्या असून यशस्वी होण्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ,मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव महाजन, उपाध्यक्ष वसंतराव पाटील, कार्याध्यक्ष सुभाष महाजन यांचेसह सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य जी.पी.बोरसे ,पर्यवेक्षक पी.एस.जोशी यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केलेले आहे.