सावद्यातील खून प्रकरणी ३ संशयितांना पोलिसांनी केली अटक

क्राईम सावदा


सावदा >> येथे मस्कावद रस्त्या लगत असलेल्या ख्वाजा नगर परिसरात शनिमंदिर जवळ दि २० ऑगस्ट रोजी सायंकाळी एका ५० वर्षीय व्यक्तीचा डोक्यात वार करून निर्घुण खून केल्याची घटना घडली यात तपास करीत तीन संशयित युवक राजू शाह दाऊद शाह,अजहर खान अयूब खान, शाहरुख खान कलीम खान याना ताब्यात घेण्यात आले आहे.

येथील ख्वाजा नगर परिसरातील रहिवासी रईस दिलदार चौधरी उर्फ रईस दंगा (वय ४२) याचा तीन अज्ञातानी दि २० रोजी सायंकाळी ५ ते ५-३० वाजेच्या दरम्यान मरीमाता मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या ख्वाजा नगरचे गेट जवळ एका किरणा दुकानाचे समोर असलेल्या बखळ जागेत डोक्यात लोखंडी पाइपाने वार करून खून केला.

रईस उर्फ दंगा हा मूळ रहिवासी मध्य प्रदेशातील लालबागच्या गुलाबगंज येथील आहे. तो काही महिन्या पासुन सावदा येथे राहत होता. यातील मयत हा रेल्वेत केळी विक्रीचा व्यवसाय करीत होता व आरोपी हे रेल्वेत चोरी करीत होते ती माहीती मयत हा पोलीसांना देतो या संशया वरुन तसेच मागील भांडणाचे कारणा वरुन लोखंडी पाईपाने हत्या केली. गुरुवारी सायंकाळी तीन व्यक्तींनी त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सदर मयत इसमावर लालबाग पोलिस स्टेशन, ब-हाणपुर (म,प्र) येथे गुन्हे दाखल असल्याचे समजते, त्या नुसार पुढील तपास स,पो,नि, राहुल वाघ व सहकारी यांनी लागलीच घटना स्थळी पोहचले व सापळा रचला असता तिघे संशयित आरोपींना ताब्यात घेतले, दरम्यान सावदा पोस्टे ला शरीफ खा दिलदारखा राहणार रावेर यांनी फिर्याद दिली.

उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांचे मार्गदर्शनाख़ाली स,पो,नि, राहुल वाघ, व पोलिस उपनिरीक्षक राजेन्द्र पवार, हे,कॉ, रविन्द्र मोरे, संजय चौधरी, व सहकारी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *