यावल >> तालुक्यातील वड्री येथील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना रविवारी घडली. एकनाथ शामराव घुले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
एकनाथ शामराव घुले हे रविवारी साडेचार वाजेच्या सुमारास शेतात काम करत होते. तेव्हा त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा त्रास वाढल्याने ते येथे आले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
वृत्त कळताच वड्रीचे सरपंच अजय भालेराव, ललित चौधरी, अँड. दत्तात्रय सावकारे, आर. के. चौधरी, गोविंदा सुरवाडे आादींनी धाव घेतली. या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मृत घुले यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ९ वाजता वड्री येथील राहत्या घरापासून निघेल.