सातगाव डोंगरी येथे उभे राहणार ७१ फूट उंचीचे भव्य हनुमान मंदिर

Social कट्टा कट्टा पाचोरा

पाचोरा प्रतिनिधी >> सातगाव डोंगरी येथील येथील अनेक वर्षांपूर्वी बांधलेले हनुमान मंदिर जीर्ण झाले होते. गावातील मारुती मंदिर पंच कमिटीने त्याच ठिकाणी नवीन मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चिदानंदस्वामी, ज्ञानेश्वर माऊली आणि प्रकाश बाबुलाल परदेशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

सातगाव डोंगरी हे गाव एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथून चार किमी अंतरावर अंजिठा पर्वतात खान्देश व मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जोगेश्वरी देवी व इंद्रगढी देवीची भव्य मंदिरे आहेत.

दरम्यान, अनेक वर्षापूर्वी सातगाव डोंगरीत मारुती मंदिराची उभारणी झाली होती. मात्र हे मंदिर जीर्णावस्थेत गेल्याने जीर्णोद्धारासाठी पंच कमिटीने ग्रामस्थांना विश्वासात घेतले.

यानंतर ७१ फूट उंच असलेल्या कळसरुपी मंदिराचे निर्माण करण्यासाठी नुकतेच चिदानंद स्वामी- ज्ञानेश्वर माऊली व प्रकाश परदेशी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.