संत नरहरी महाराज यांची जयंती शासकीय पातळीवरून साजरी करण्यात यावी

Jalgaon Social कट्टा कट्टा जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना संस्थेचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी हर्षल सोनार >> ऑगस्ट महिन्यात येणारी संत नरहरी सोनार यांची जयंती शासकीय पातळीवर सर्वत्र साजरी केली जावी या मागणीचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार संस्थेतर्फे शुक्रवारी 4 डिसेंबरला दुपारी देण्यात आले.

महाराष्ट्र शासन विविध संत समाजसुधारकांचे, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्याला उजाळा देत असतो. शासनाने आजवर अनेक महापुरुषांचे वेळोवेळी स्मरण केले आहे. त्याचप्रमाणे विठ्ठलाचे निस्सिम भक्त, वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी, सोनार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराज यांच्या जयंतीचा देखील २०२१ सालापासून समावेश शासकीय पातळीवरून करण्यात यावा असे मागणी निवेदनातून संस्थेने केलेली आहे.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, शासकीय पातळीवर निवेदन पोहोचवून याबाबत पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले. निवेदन देतांना संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सोनार, सचिव हर्षल सोनार तसेच शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, नगरसेवक विष्णु भंगाळे, प्रदिप सोनार, निलेश वाघ, हरिष जगताप, प्रमोद विसपुते होते.