सांगली >>सांगली तालुक्यातील हातनूर येथे एकाच दिवशी भावकीतील विवाहितेने आणि तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अनुराधा गणेश सुतार (३३) हिने विषारी द्रव्य प्राशन करून घरी आत्महत्या केली, तर जयदीन रामचंद्र सुतार (२२) हा घराच्या समोरच पहाटेच्या सुमारास मृतावस्थेत आढळला. दोघांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत एकाच भावकीतील असून हातनूर येथे राहतात. त्यातील अनुराधा सुतार हिने गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले.
उपचारासाठी तिला सांगली येथे आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर जयदीप सुतार त्याच्या घराच्या समोरच पहाटेच्या सुमारास मृतावस्थेत आढळला.
दरम्यान, दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या केली. दोघेही एकाच भावकीतील होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय ?
याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलिस तपासात या घटनेमागील कारण समोर येईल, अशी माहिती देण्यात आली.