१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; गुन्हा दाखल

क्राईम धुळे साक्री

प्रतिनिधी ::> धुळे साक्री तालुक्यातील भाडणे येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. भाडणे गावातील इंदिरा नगरात राहणारी १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही आढळली नाही.

याप्रकरणी शरद श्यामराव जाधव याचे नाव समोर आले. शरदने मुलीला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी साक्री पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.