साक्री तालुक्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या धुळे माझं खान्देश साक्री

धुळे >> साक्री तालुक्यातील नवडणे येथे गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. काळू मोरे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी साक्री पोलिसात नोंद करण्यात आली आहे. नवडणे येथील काळू चांभाऱ्या मोरे ( वय २८) या तरुणाने घरामागे असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला. सकाळी सात वाजता हा प्रकार समोर आला. या प्रकरणी ईश्वर रामा पवार यांच्या माहितीवरुन साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समोर आले नाही.