साकळी येथे ‘घरीच किल्ले बनवा’ स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार शिवचरित्राला उजाळा !

Social कट्टा कट्टा यावल साकळी

● स्पर्धेला सुरुवात
● दोन दिवस चालणार स्पर्धा
● स्पर्धा राबवणारे जय दुर्गा मित्र मंडळ ठरले एकमेव

मनु निळे >> साकळी ता.यावल येथील जय दुर्गा मित्र मंडळ, बाजारपेठ या मंडळाच्या वतीने दि. २३ व दि. २४ अशा दोन दिवसांची “घरीच किल्ले बनवा स्पर्धा ” आयोजित करण्यात आलेली असून ही स्पर्धा तब्बल ३० तासांच्या जवळपास चालणार आहे.

अतिशय अभिनव व नाविन्यपूर्ण संकल्पितस्पर्धा मंडळाच्या वतीने ‘ पहिल्यांदाच ‘ राबविली जात आहे. तर गावातही अशा प्रकारची स्पर्धा राबवणारे जय दुर्गा मित्र मंडळ हे ‘ एकमेव ‘ मंडळ ठरले आहे. कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेऊनच ही स्पर्धा घरोघरी राबवण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आहेत.

शिवनेरी

तर मग……चला आपण आपल्या घरीच कुटुंबासंगे “गड-किल्ला” बनवूया!

या संकल्पनेवर आधारित…
सुंदर गड-किल्ले बनवा स्पर्धा-२०२० असणार आहे. सदर स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धक शिवनेरी तोरणा, रायगड, राजगड, जलदुर्ग जंजिरा, प्रतापगड अशा विविध प्रकारच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती दगड ,माती,विटा,गोणपाट यासह विविध पर्यावरण पूरक घटकांचा वापर करून साकारणार आहे. ही अनोखी स्पर्धा राबविल्याने मंडळाच्या कार्यक्षेत्रात उत्साहाचे व नवचैतन्याचे तसेच घराघरात ‘शिवमय’ वातावरणाची निर्मिती होणार आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२४ रोजी किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण करून त्यांना सजविले जाणार आहे व त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शिवअभ्यासकांच्या उपस्थित परीक्षण केले जाणार आहे. यानंतर ही स्पर्धा संपूर्ण शिवप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी खुली केलेली आहे.

मंडळाच्या महिला पदाधिकारी सौ. शुभदा दामोदर नेवे व सौ.रोहिणी योगेश नेवे यांच्याकडे स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून छत्रपतीं शिवरायांच्या पावन व अजरामर इतिहासाला उजाळा दयावा. तसेच किल्ले पाहतांना नागरिकांनी तोंडाला मास्क लावून तसेच योग्य असे सोशल डिस्टन ठेवावे असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आलेले आहे.