हिवाळ्यात पाऊस न पडता साकळी-मनवेल येथील नदीला आला अचानक पूर

यावल साकळी सिटी न्यूज

पाट बंधारे विभागाचा गलथान कारभार

साकळी-मनवेल गोकुळ कोळी प्रतिनिधी >> साकळी-मनवेल येथील भोनक नदीला अचानक सकाळी पूर आल्याने ग्रामस्थ अचंबित झाले. नदी अचानक दोन्ही बाजूने दुफडी वाहु लागल्यामुळे पुर पाहण्यासाठी गर्दी जमु लागली तर नदीच्या पात्रातुन सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांची ताराबंळ उडाली. नदीला अचानक आलेल्या पुराची खात्री केली असता पाट बंधारे विभागाचा हतनूर कॅनल जवळ काही टवाळखोरानी पाटाचा पाणी नदीच्या पात्रातुन सोडण्या करीता लावण्यात आलेले गेट ओपन केले होते व सकाळीच हतनुर धरणातुन कालव्यात पाणी सोडण्यात आल्यानंतर पाणी सरळ नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणात विसंर्ग झाल्याने नदी दुफडी वाहु लागली आहे.

पाट बंधारे विभागाचे दुर्लक्ष
साकळी येथून जवळच असलेल्या पाटचारी येथे कर्मचाऱ्याची गरज आहे. येथे कोणीही लक्ष द्यायला नसल्याने शासनाचे खूप मोठे नुकसान होत आहे. पाटचारीवर असलेल्या पुलावरील लोखंडी कठडे लावण्यात आले होते. त्यावरील लोखंडी कठडे हे लोखंडी पाईपचे असून ते चोरीला जात आहेत. मात्र याकडे लक्ष द्यायला कोणीही नसल्याने चोरांचा जोरदार धुमाकूळ सुरु आहे. दररोज कठड्यावरील एक एक लोखंडी पाईप चोरीला जात आहे. असे करता करता संपूर्ण कठडा एका बाजूने गायबच झाला असे म्हणावे लागेल. त्वरित पाट विभागाने होणाऱ्या नुकासानाकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

मनवेल येथील भोनक नदीला आला अचानक पूर