यावल तालुक्यात फैजपूर-साकळी गावात एक-एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले!

फैजपूर यावल

रीड जळगाव टीम >> आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात दोन कोरोना रुग्ण आढळून आले असून एक फैजपूर शहरातील ४० वर्षीय महिला तर तालुक्यातील साकळी येथील ४८ वर्षीय पुरुष असे दोन रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात रुग्णांची संख्या १४५ झाली आहे. तर आढळून आलेल्या रुग्णांच्या परिसरात प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच साकळी येथील रुग्ण हा गावातील केळी ग्रुप्स व अनेक व्यापारी वर्गाशी संबधित असल्याचे सूत्रांकडून समजते. दोघा रुग्णांवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटर मध्ये सध्या उपचार सुरु आहेत. साकळी येथील रुग्णांची संख्या ७ झाली आहे. तसेच यावल तालुक्यातील ८४ गावांपैकी २१ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *