साकळीतील भवानी माता परिसरात अंधारमय नवरात्रीउत्सव केला जातोय साजरा

निषेध यावल रिड जळगाव टीम साकळी

रिड जळगाव टीम ::> साकळी येथील भवानी माता मंदिर परिसरात गेल्या ४ महिन्यांपासून वीज खांबावरून बत्तीगुल झाली आहे. बाजार परिसर हा पूर्णपणे अंधारमय झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात भवानी मातेच्या मंदिर परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार सांगितले. मात्र एकदाही त्याकडे लक्ष दिले नसल्याचे आरोप भवानी माता परिसरातील नागरिकांनी केला आहे.

नवरात्री उत्सव सुरु होऊन आज ५ दिवस झाले तरीही या परिसरात विजेच्या पोलवर लाईट लावण्यात आले नसल्याने परिसरातील नागरिकांसह भाविकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गावातील अनेक ठिकाणी खांबावर लाईट नसल्याने वयोवृद्ध व्यक्तींना दिसत नसल्याने अनेक वेळा त्रास सहन करावा लागत आहे.अशा अनेक तोंडी तक्रारी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी केल्या आहेत. अद्यापही याकडे लक्ष न दिल्यास परिसरातील नागरिक आंदोलनाची भूमिका घेतील अशी भीती वर्तवली जात आहे. तरी ग्रामपंचायतने जातीने लक्ष घालून भवानी माता परिसरातील समस्या सोडवण्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.