लोकांनी मला भाजपकडून निवडून दिलंय. त्यामुळं मी पक्षातच राहणार : खा. रक्षा खडसे

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव मुक्ताईनगर

रिड जळगाव टीम ::> गेल्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री एकनाथ खडसे हे पक्ष बदलाच्या चर्चेत होते. आज त्यांनी अधिकृतपणे आपण भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत खडसे हे राष्ट्रवादीत येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

यावर खा. रक्षा खडसे यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाल्या की, बाबांचा (एकनाथ खडसे) निर्णय दु:खद आहे. मी भाजपकडून निवडून आलेली आहे. लोकांनी मला भाजपकडून निवडून दिलंय. त्यामुळं मी पक्षातच राहणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पूर्ण करणार. नाथाभाऊंनी देखील पक्षाचं योगदान मान्य केलंय. 40 वर्ष त्यांनी पक्ष वाढवला. मात्र आज त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळं त्यांनी राजीनामा दिलाय, असं त्या म्हणाल्या.

रक्षा खडसे म्हणाल्या की, बाबांनी माझ्यावर कधीच कुठला दबाव टाकलेला नाही. त्यांचं आणि माझं मत जनतेची सेवा करणं हेच आहे. मी कधीपर्यंत पक्षात राहणार याचं भाकित कुणीच करु शकत नाही. कुणाबाबतच असं भाकित आपण करु शकत नाही. आता आपण भाजपमध्येत असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.

येत्या शुक्रवारी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे तसेच जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच उद्या गुरुवारी खडसे समर्थकांनी मुंबईत जाण्यासाठी सज्ज आहेत. या दरम्यान खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खडसे यांनी पक्ष का सोडला यावर त्यांनी एकच उत्तर दिल आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या छळानेच पक्ष सोडल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.