परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी – सह्याद्री प्रतिष्ठान ची मागणी

Social कट्टा आंदोलन कट्टा

चाळीसगांव राज देवरे ::>- सध्या परिस्थितीमध्ये पाहता कोरोना आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. कुठल्याही प्रकारचा आधार शेतकरी राजाला राहिला नसून ह्या प्रचंड झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी राजा उभा राहावा व त्याला हातभार मिळावा म्हणून शासनाने त्यांचे सरसकट पंचनामे करून सरसकट मदत द्यावी तसेच कर्ज माफी द्यावी या मागणीचे निवेदन आज सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने चाळीसगाव चे तहसीलदार मोरे यांना दिले आहे.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे मा अध्यक्ष दिलीप घोरपडे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम चव्हाण, जळगाव जिल्हा प्रशासक गजानन मोरे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक राजपूत, तालुका कार्याध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी, रवींद्र दुशिंग जिल्हा उपाध्यक्ष विवेक रणदिवे, तालुका अध्यक्ष विनोद शिंपी, मुन्ना पगार आदी उपस्थित होते.