भाजपाच्या घरातील धुण्यांमध्ये अनेक धुणी डाग पडलेली आहेत, सचिन सावंतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Politicalकट्टा महाराष्ट्र

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी एका खाजगी वहिनीला मुलाखत देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखती दरम्यान खडसे म्हणाले की, काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स आणि कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ती समोर आली तर मोठी खळबळ उडेल पण मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करत नाही.वरिष्ठांना मी ते दाखवले आहेत. त्यांच्यासारख्या चुका मी केल्या नाहीत, अस खडसे यावेळी म्हणाले.

या व्यक्तिगत बाबी आहेत. मी वरिष्ठांसमोर त्या मांडल्या आहेत. त्यांच्याकडून मला न्याय मिळाला नाही तर मी ते जनतेसमोर मांडेन. मला ज्यांच्यापासून त्रास झाला आहे त्यांच्याबद्दल दया असण्याचे कारण नाही. जे होईल ते जनतेसमोर येईल, असा इशाराच खडसे यांनी दिला आहे.

आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी खडसेंना आवाहन केले आहे की जनतेच्या हितासाठी त्या व्हिडिओ क्लिप्स आणि कागदपत्रे बाहेर येऊ द्या. सचिन सावंत यांनी “एकनाथ खडसे तथा नाथाभाऊंनी त्यांच्याकडे असलेले भाजपाच्या कोणत्यातरी नेत्यांचे व्हिडिओ क्लिप व फोटो देशहितासाठी जनतेसमोर आणले पाहिजेत. त्यांच्या गप्प राहण्यामुळे भाजपच्या माध्यमातून जनहितविरोधी व ज्यांचे चरित्र संशयास्पद आहे असे नेतृत्व जनतेवर लादले जात असेल तर ते उचित नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यासोबतच सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ” खडसे साहेब, भाजपाच्या घरातील धुण्यांमध्ये अनेक धुणी डाग पडलेली आहेत. फडणवीस साहेब क्लीनचीट देऊन सर्व ड्रायक्लीन करुन टाकतात. देशहितासाठी आपल्या कडील सर्व व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत. जनतेला ठरवू द्या ड्रायक्लीन करायचे की विल्हेवाट लावायची! भाजपा नेत्यांवरील ये डाग अच्छे नहीं!” असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *