रावेर तालुक्यातील रोझोदा येथे वयोवृद्ध पती-पत्नीचा गळा चिरून धारधार शस्त्राने निर्घृण हत्या!

क्राईम रावेर

रावेर प्रतिनिधी ::> तालुक्यातील रोझोदा येथे वयोवृध्द पति पत्नीचा गळा चिरुन धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याची दि.९ सप्टेंबर मध्यरात्री घटना घडली असून दि.10 रोजी डाँ.हारुन काझी हे कंटेनमेंटझोन क्षेत्रात आरोग्य तपासणीसाठी गेले असता.घराचा दरवाजा उघडा असल्याने घरात प्रवेश केल्यानंतर दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे निदर्शनास आले.

रावेर तालुक्यातील रोझोदा येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी ओंकार पांडूरंग भारंबे (वय ९०). सुमनबाई ओंकार भारंबे (वय – ८४) हे आपल्या राहत्या घरात असताना दोघ पति पत्नीचा अज्ञात व्यक्तिंकडून धारदार शस्त्राने गळा चिरुन निघृण हत्या करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक डाँ.हारुन काझी हे कंटेनमेंटझोन क्षेत्रात आरोग्य तपासणीसाठी गेले असता.घराचा दरवाजा उघडा असल्याने घरात प्रवेश केल्यानंतर दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे निदर्शनास आले.सदर घटनेची सावदा पोलीसात पोलीस पाटील वासुदेव हिवरे यांनी माहिती दिली.घटनास्थळी फाँरेंसिक लँब घडलेल्या घटनेचा विचार करता चोरीच्या उद्देश्याने हत्त्या करण्यात आल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत असून डी.वाय.एस.पी.गजानन राठोड.सावदा पोलीस उपनिरीक्षक राहूल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांना दोन मुलं नोकरीस सुनिल व संजय.दोघेही मुंबईला नोकरीस आहेत. भर वस्तीत घटना घडल्याने रोझोदा परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *