आदिवासी भागातील रस्त्याची दुरुस्ती करा : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

Politicalकट्टा आंदोलन कट्टा फैजपूर

फैजपूर प्रतिनिधी ::> आदिवासी भागातील बोरखेडा ते तिळया, अंधारमळी व मोहमांडली रस्त्याची पार दुर्दशा झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्ते सुधारण्याच्या मागणीसाठी आदिवासी एकता मंचातर्फे येथे प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन देण्यात आले.

बोरखेडा ते तिळया, अंधारमळी व मोहमांडली ह्या रस्त्यांची पुरती दैना उडाली आहे. या तिन्ही गावांमध्ये सर्वत्र आदिवासी बांधवांचा रहिवास आहे. दवाखाने, बाजार, शाळा, कॉलेज या सुविधा सर्व फैजपूरला असून तेथे जाण्यासाठी हाच एकमेव एक रस्ता आहे. मात्र तोही खराब झाल्यामुळे सर्वांचे हाल होत आहेत.

हा रस्ता मंजूर आहे किंवा नाही, मंजूर असेल तर रस्त्याचे काम का झाले नाही याबाबत चौकशी करावी व समस्या सोडवावी, अशी मागणी करून मंचने आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी जिल्हा संघटक रब्बील तडवी, तालुकाध्यक्ष सरदार तडवी, मुस्तफा अरमान तडवी, जहागीर सिकंदर तडवी, फरिद शवखा, जावेद फकीर, समीर मोहंमद तडवी उपस्थित होते.