रावेर-यावल-चोपडा केळी उत्पादकांची व्यथा ; भाव आहे तर माल नाही!

Jalgaon अडावद चोपडा जळगाव फैजपूर यावल रावेर सावदा सिटी न्यूज

रावेर : जळगाव, रावेर ,यावल चोपडा या भागातील केळी मागणी व्यापारीकडून वाढली आहे. मात्र जुनारी व पिल बागांमध्ये मध्ये केळी माल अल्प प्रमाणात आहे. चोपडा भागात माल आहे, तरीही पाहिजे तसा माल नाही.

सद्यस्थितीत केळीला बऱ्या पैकी मागणी आहे. मात्र, केळी बागांमध्ये पाहिजे तेवढा माल नाही दरसाल प्रमाणे या ही वर्षी भाव आहे तर माल नाही या परिस्थीतीला या ही वर्षी सामोरे जावे लागत आहे. सद्या ९०० ते १२०० पर्यंत सर्वच जागी असे समाधानकारक भाव आहे. मात्र माल नसल्याने उत्पादक केवळ बोर्ड वर शोभेचे आकडे बघत आहे.

आज मितीस जुनारी केळी बाग तसेच काही जणांचे केळी चे पिल बागांमध्ये अल्प प्रमाणात केळी माल उपलब्ध आहे मात्र जिल्ह्यातील केळी ची मागणी मात्र वाढल्यागत स्थीती आहे. सुरू असलेल्या पित्तरपाटा, अधिक मास यात पूजा अर्चा व उपवास या मुळे देशभरात केळी ची मागणी वाढते सद्या ही मागणी वाढली आहे.

केळी ला ९०० ते १२०० पर्यंत भाव असले तरी हे भावाचा उत्पादकांना काही फायदा होत नसल्याने बोर्ड वरील भाग शोभेचे आकडे ठरत आहे. अजून नवती केळी कापणीवर यायला ४ महिन्याचा अवधी आहे त्यामुळे आज केळी पट्ट्यात माल नाही मात्र भाव आहे अशी स्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा रिड जळगावचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि इन्स्टाग्रामवर.

Facebook Instagram Twitter Whatsapp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *