रावेरात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, गुन्हा दाखल

आत्महत्या क्राईम रावेर

रावेर >>येथील ४२ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली. भारती दिनेश चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. जुना सावदा रस्त्यावरील पंचमुखी हनुमान नगरातील रहिवासी असलेल्या भारती चौधरी यांनी राहत्या घरात सुतळीच्या साहाय्याने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी बचत गटाचे सहकारी घरी आले तेव्हा भारती चौधरी या गळफास अवस्थेत आढळून आल्या. रावेरत पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद झाली.